घरगुती विद्युत मीटरमध्ये फेरफार करून बिल कमी करण्याच्या उद्देशाने मीटरसोबत छेडछाड केल्यानंतर वडगाव गुप्ता येथील एका महिलेच्या विरोधात वीज चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11 एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महावितरण कंपनीचे भरारी पथकातील अभियंता हरिश्चंद्र पोपळघट यांनी महिलेच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिलेली आहे.
वडगाव गुप्ता येथील एका महिलेने घरगुती वापराच्या इलेक्ट्रिक मीटरमध्ये छेडखानी करत वीज वापराची कमी नोंद होईल या उद्देशाने मीटर सोबत छेडछाड केली होती. बारा महिन्यांच्या कालावधीमध्ये हा प्रकार घडलेला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.