नगर शहरात घडलेल्या भिक्षेकरी मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी प्रहारचे बच्चू कडू यांनी केलेली आहे. ‘ आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन करण्यात येईल सोबतच पालकमंत्र्यांना घेराव घालू ,’ असा देखील इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे
बच्चू कडू यांनी सदर घटनेत मरण पावलेले सारंगधर वाघमारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तसेच राहत्याचे तहसीलदार अमोल मोरे यांचीही बच्चू कडू यांनी भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले की ,’ गरिबाच्या मृत्यूला किंमत राहिलेली नाही. चार जण मृत्युमुखी पावले . त्यांच्या हातात जर एखादा झेंडा असतात तर वातावरण तापले असते. झेंडा हातात नसल्याने त्यांच्या मृत्यूला किंमत राहिलेली नाही. तहसीलदार म्हणतात मला घटना माहीत नाही. मृत्यू पावलेले लोक आमच्या तालुक्यातील नाही त्याला काय म्हणावे ? ‘
बच्चू कडू पुढे म्हणाले की ,’ शिर्डीत आतापर्यंत भिक्षेकरांचे पुनर्वसन केंद्र का उभारले नाही ? कुत्र्याची बातमी होते पण गरिबाच्या मरणाला कोणी किंमत देत नाही. कमीत कमी त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस तर करा ,’ असे देखील ते पुढे म्हणाले. जाती धर्माच्या नावावरमध्ये मिळतात ईव्हीएम घोटाळा होतो त्यामुळे गरिबांकडे लक्ष देण्याची आता सत्ताधाऱ्यांना गरज वाटत नाही , असेही ते पुढे म्हणाले.
भिक्षेकर्यांचा मृत्यू झाल्यानंतर जनसामान्यांमध्ये प्रचंड आक्रोश असून जर मयत पावलेले व्यक्ती भिकारी होते आणि त्यांना नातेवाईक होते तर त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ का आली ? अशी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे मात्र दुसरीकडे मयत झालेल्या व्यक्तींमध्ये नक्की भिक्षा मागणारे किती होते ? याविषयी देखील मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. केवळ कुणालातरी ताब्यात घ्यायचं म्हणून दर्शनासाठी आलेल्या व्यक्तींनाच ताब्यात घेण्यात आले असाही आरोप मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेला आहे.