काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये बोलताना भाजपला पराभूत करण्याचे सामर्थ्य केवळ काँग्रेस पक्षात आहे असे म्हटलेले आहे.
गुजरातमधील आरवली जिल्ह्यातील मोडासा इथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की ,’ गुजरात हे काँग्रेससाठी महत्त्वाचे राज्य आहे. गुजरातमध्ये 2017 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून भाजपला पराभूत करणे अवघड नाही इतकेच नव्हे तर आरएसएसला आणि भाजपला पराभूत करण्याचे सामर्थ्य केवळ काँग्रेसमध्ये आहे ,’ असे ही ते पुढे म्हणाले.