पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण काय केले हे सांगण्यापेक्षा अनेकदा सातत्याने काँग्रेसवरच टीकास्त्र सोडत असतात. दहा वर्षांपासून अधिक काळ सत्ता उपभोगून देखील नरेंद्र मोदी यांचा प्रचार हा काँग्रेसवर टीका करण्यावरच केंद्रित असल्याचे दिसून येते. त्यांनी केलेल्या एका विधानाचा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे.
मुंबई येथे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की ,’ मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेली वक्तव्य अत्यंत हास्यस्पद असून या विधानाचा मी निषेध करतो. काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष हे दलित समाजाचे आहेत मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दलित मुस्लिम किंवा महिला कधी होणार ?. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित झालेले आहे. साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती ही काँग्रेसच्याच काळात झालेली आहे. मोदी अकरा वर्षांपासून सत्तेत आहेत त्यांनी देशाचे काय भले केले हे त्यांनी जाहीर करावे .
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की ,’ नरेंद्र मोदी यांनी केवळ हिंदू मुस्लिम दलित संवर्ण ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचे काम केले. ट्रिपल तलाक वक्फ बोर्ड असे मुद्दे उपस्थित करून मुस्लिम महिलांबद्दलची आपली खोटी तळमळ दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत मात्र अकरा वर्षात एकाही मुस्लिम महिलेला आमदार , खासदार, मंत्री मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री देखील त्यांनी केलेले नाही उलट मोदींच्या काळात मुस्लिम आणि दलितांवर अत्याचार वाढलेले आहेत. जमावाकडून त्यांची हत्या केली जाते ते रोखण्यासाठी मोदींनी काही केलेले नाही त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काहीच अर्थ नाही ,’ असेही ते पुढे म्हणाले.