आमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहाल तर शिवसेना स्टाईल चोप देणार , नगरच्या महाविद्यालयात संतापजनक प्रकार  

शेअर करा

अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोड परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलेला असून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आरोपीला चोप देण्यासाठी शहर प्रमुख किरण काळे यांनी शिवसैनिकासोबत आरोपीचा शोध घेण्याचे घेण्यास सुरुवात केली मात्र दरम्यानच्या काळात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलेले आहे. कोतवाली पोलीस स्टेशनला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी ही घटना घडलेली आहे. 

पीडित मुलीच्या पालकांसोबत शिवसैनिकांनी देखील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात मोठी गर्दी केलेली होती.  पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आपली कैफियत काळे यांना सांगितली त्यानंतर काळे यांनी पोलीस निरीक्षक दीपक दराडे यांच्याकडे आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करत पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला. शिवसेनेच्या मागणीनंतर संबंधित आरोपीवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

किरण काळे यांनी घडल्या प्रकारावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा घटना घडू नये यासाठी समाजात अपप्रवृत्तींवर वचक निर्माण करण्याकरिता प्रभावी पोलीसिंगची गरज आहे. महाविद्यालयांमध्ये दामिनी पथकाचा सतत राबता ठेवा, अशी मागणी काळे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने विलास उबाळे यांनी आवाहन केले आहे की, शहरात कुठेही महिलांशी गैरवर्तन, छेडछाड असे प्रसंग होत असतील तर त्यांनी शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांच्या ९०२८७२५३६८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ३६५ दिवस २४ तास मदतीसाठी शिवसेनेने हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. पोलिसां आधी शिवसैनिक त्या ठिकाणी मदतीसाठी पोहोचतील. पीडितांचे नाव गुप्त ठेवले जाईल. अन्याय, अत्याचार सहन करू नका. शिवसेनेशी संपर्क साधा, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.


शेअर करा