नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका झेरॉक्स दुकानदाराने झेरॉक्स काढण्याच्या बहाण्याने वीस वर्षीय तरुणीसोबत गैरवर्तन केलेले आहे. आरोपीने तिचा मोबाईल घेऊन तिच्या मोबाईलमधील फोटो घेऊन इंस्टाग्रामवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. रेल्वे स्टेशन रोडवरील पंचायत समिती कार्यालयासमोर सुपर फाईन झेरॉक्स दुकान इथे 11 तारखेला दुपारी हा प्रकार घडलेला आहे.
फिर्यादी तरुणीने कोतवाली पोलिसात आरोपीच्या विरोधात फिर्याद नोंदवली असून फिर्यादी तरुणी ही त्याच्या झेरॉक्स दुकानात झेरॉक्ससाठी गेलेली होती. मोबाईलवर पीडीएफ पाठवण्यास तरुणाने तिला सांगितले त्यावेळी त्याने पीडीएफवरून झेरॉक्स निघत नाही असे सांगत ब्लूटूथने डॉक्युमेंट शेअर करा असेही तिला सांगितले मात्र त्यातही यश आले नाही.
आरोपीने दरम्यानच्या काळात तिचा मोबाईल घेतला आणि दहा ते पंधरा मिनिटे स्वतः जवळ ठेवला त्यानंतर तिचा मोबाईल आणि रेशन कार्डची झेरॉक्स तिला दिली. तरुणी तिथून निघून गेल्यानंतर थोड्याच वेळात तिने मोबाईल चेक केला त्यावेळी मोबाईल वरून तिचे फोटो तिला सेंड होताना दिसत होते. सर्व फोटो सक्सेसफुली सेंड झाल्यानंतर इंस्टाग्राम आयडीवरती अर्शद नाज हसन सय्यद यास फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. अर्शद नाज हसन सय्यद ( वय 26 वर्ष राहणार सावजी थ्रेडजवळ आशा टॉकीज चौक ) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.