कुणावर कोणती वेळ कधी येईल काही सांगू शकत नाही अशीच एक घटना सध्या मध्यप्रदेशात घडलेली आहे. मध्यप्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमात बळी देण्यासाठी बोकड घेऊन निघालेली एक एसयूव्ही कार कोरड्या नदीमध्ये कोसळली आणि चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. विशेष बाब म्हणजे ज्या बोकडाचा बळी देण्यासाठी चालवलेले होते तो बोकड मात्र वाचला आहे.
उपलब्ध माहितीनुसार ,’ पटेल कुटुंबातील सहा जण नरसिंहपूरच्या दादा दरबार येथे बोकड आणि कोंबड्याचा बळी देण्यासाठी निघाले होते. बोकड आणि कोंबडा प्रतिकात्मक भोग दाखवून घरी येऊन पटेल कुटुंब चिकन-मटणवर ताव मारणार होते. मात्र जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 30 किलोमीटर दूर चरगवा-जबलपूर मार्गावर सायंकाळी तीन ते चारच्या सुमारास एसयूव्ही कार पुलाचे कठडे तोडून कोरड्या नदीमध्ये कोसळली. उंचावरून पडल्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला होता आणि मृतदेह कारमध्ये अडकले होते.
किशन पटेल (वय 35), महेंद्र पटेल (वय 35), सागर पटेल (वय 17) आणि राजेंद्र पटेल (वय 16) या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर जितेंद्र पटेल (वय 36) आणि मनोज प्रताप (वय 35) हे गंभीर जखमी झाले आहेत. पटेल कुटुंब बळीसाठी एक बोकड आणि कोंबडाही सोबत घेऊन जात होते. या अपघातामध्ये कोंबड्याचा मृत्यू झाला तर बोकडाचा फक्त कान कापला गेला पण त्याचा जीव वाचला, असे पोलिसांनी सांगितले. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.