नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून चिकन चिल्ली खाल्ल्यानंतर बिल मागितले म्हणून एका 36 वर्षीय महिलेला शिवीगाळ आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आलेले आहे. नगर कॉलेजजवळील एका चायनीज दुकानात ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शपाक इस्माईल शेख ( राहणार बाबा बंगाली चौक ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून दारू पिऊन तो चिकन चिल्ली खाण्यासाठी गेलेला होता. चिकन चिल्ली खाल्ल्यानंतर काउंटरवरील महिलेने त्याला पैसे मागितले त्याचा त्याला राग आला आणि त्याने महिलेला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. महिलेने त्याला जाब विचारला त्यानंतर त्याने तिचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत ‘ तू फक्त बाहेर भेट तुझा जीवच घेतो ‘ असे म्हटले . फिर्यादी महिलेने त्यानंतर पोलिसात धाव घेतली.