माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी मढीत कानिफनाथाच्या चरणी महापूजा

शेअर करा

आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण काका जगताप हे पुण्यात सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून उपचारांना यश मिळून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी मढी येथील कानिफनाथांच्या चरणी महापूजा आणि अभिषेक घालून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तसेच आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे. 

श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राधाकिसन मरकड , सहसचिव एडवोकेट डोके, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिक विधाते, अमित खामकर यांनी कानिफनाथांच्या चरणी दर्शन घेत माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी महापूजा केली. 

माजी आमदार अरुण काका जगताप हे नगरमध्ये जनसामान्यात प्रचंड लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील असून गेल्या काही दिवसांपासून पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी नगर शहरात देखील ठिकठिकाणी पूजा अर्चना करण्यात येत आहे. 


शेअर करा