भाजप नेते गिरीश महाजन यांचे आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध ? ,  महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

शेअर करा

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खळबळजनक असे आरोप केलेले असून गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा दावा केलेला आहे. एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर राज्यात एक एकच खळबळ उडालेली असून धनंजय मुंडे यांचे कारनामे बाहेर आलेले असताना गिरीश महाजन हे देखील संकटात सापडलेले आहेत. 

काय म्हणाले एकनाथ खडसे ? 

पत्रकार अनिल थत्ते यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात गंभीर आरोप केला आहे. त्यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असे म्हटलेले आहे . मला या आयएएस महिला अधिकाऱ्याचे नाव माहिती आहे मात्र त्यांचे नाव मी घेणे उचित होणार नाही, असे या पत्रकाराने सांगितले. 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्याकडे बैठक झाली होती. या बैठकीवेळी अमित शाहा यांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं. त्यावेळी तुमचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत. दिवसभरातून 100 वेळी तुमचे तिथे कॉल्स झालेले आहेत. हे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत, असे अमित शाह यांनी महाजनांना सांगितले होते. 

गिरीश महाजन यांचे गेल्या 10 वर्षांतील सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती पढे येईल. यामध्ये तथ्य काय आहे, ते समजेल. मी अमित शहा साहेबांना बऱ्याचदा भेटतो. त्यामुळे आमची भेट झाली तर यात तथ्य काय आहे, हे अमित शाहा यांना विचारणार आहे.

गिरीश महाजन यांच्या वर झालेल्या गंभीर आरोपानंतरगिरीश महाजन यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र त्यांच्या बचावाच्या उद्देशाने संजय शिरसाट यांनी बोलताना,’ आरोपांची जंत्री संपली की, राजकारणात असे नवेनवे उद्योग काही लोक सुरू करतात. एकनाथ खडसे यांनी आरोप करायचे म्हणून केले आहेत. ज्या महिला अधिकाऱ्यासोबत संबंध जोडले जात आहेत, त्या अधिकाऱ्याने कुठे दावा दाखल केला आहे का? कुठे तक्रार केली आहे का? त्यामुळे थेट नरेटिव्ह सेट करण्यासाठी असा आरोप केला जात आहे. महिलाने तक्रार केली पाहिजे. तसं झालं तर सरकार योग्य दखल घेईल. अमित शाहा यांच्याकडे पुरावे असूनही गिरीश महाजन यांना मंत्रिपद कसं मिळू शकेल. सर्व बाबींची तपासणी करूनच आज गिरीश महाजन हे मंत्रिपदावर आहेत .’  असे म्हटलेले आहे. 


शेअर करा