ईव्हीएमवर अमेरिकेच्या तुलसी गॅबार्ड यांच्याकडून प्रश्नचिन्ह ,  भारतीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण की..

शेअर करा

भारतात ईव्हीएमवर वारंवार शंका उपस्थित होऊन देखील भाजप वगळता इतर कुठलाही पक्ष ईव्हीएमचे समर्थन करत नाही. अमेरिकेकडून देखील आता ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केले जाऊ शकतात. म्हणूनच मतदारांना निवडणुकीच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत कागदी मतपत्रिका (बॅलेट पेपर) लागू करण्याची गरज आहे. 

तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकन ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, भारतीय निवडणूक आयोगाने दावा केला आहे की आतापर्यंत झालेल्या मतदानात पाच कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटची पुष्टी झाली आहे, जी ईव्हीएम मतांशी जुळताना बरोबर आढळली. दहा महिन्यांपूर्वी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलाॅन मस्क यांनी 15 जून ईव्हीएम रद्द केले पाहिजे, असे म्हटले होते. ते मानव किंवा एआयद्वारे हॅक होण्याचा धोका आहे. जरी हा धोका कमी असला तरी तो खूप जास्त आहे. 


शेअर करा