‘ त्या ‘ यूट्यूब चैनलने मुद्दाम खोडसाळपणा केल्याचा आरोप , किरण काळेंनी नोंदवला गुन्हा 

शेअर करा

नगर शहरातील एका यूट्यूब चैनलवर ‘ किरण काळे याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल ‘ यासंदर्भात वृत्त एका युट्युब चॅनेलने प्रसारित केलेले होते. वास्तविक ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला त्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्याशी कुठलाही संबंध नाही. केवळ पहिले नाव आणि आडनाव समान असल्याने सनसनाटी वृत्त देण्याच्या नादात हा प्रकार घडल्यानंतर शहरात या प्रकाराची जोरदार चर्चा झाली. 

वास्तविक ज्या व्यक्तीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याचे पूर्ण नाव किरण उत्तम काळे असे आहे तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांचे पूर्ण नाव किरण गुलाबराव काळे असे आहे. समाजात संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला असा आरोप किरण काळे यांनी केलेला असून पाकीट पत्रकारितेवर देखील निशाणा साधलेला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेत संबंधित youtube चॅनलचा मालक आणि पत्रकार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 356 ( 2 ) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कोतवाली पोलीस तपास करत आहेत. 


शेअर करा