बीड जिल्ह्यात महिला वकिलाला बेदम मारहाण , फक्त इतकंच घडलं की..

शेअर करा

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एक प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून एका महिला वकिलाला गावकऱ्यांनी गाठून बेदम मारहाण केलेली आहे. पीडित महिलेच्या जबाबावरून युसूफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 10 पैकी मुख्य आरोपी हा गावातील सरपंच असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या सर्व आरोपी फरार आहेत. 

तक्रारदार महिला ही अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करते. गावातील सरपंच आणि काही गावकऱ्यांनी रिंगण बनवले आणि त्या रिंगणात आपल्याला बेदम मारहाण केली असा या महिला वकिलाचा दावा आहे. माध्यमांना या महिला वकिलाने तिच्या पाठीवर आणि मानेवर झालेल्या मारहाणीचे वळ देखील दाखवले . 

पीडित महिलेने घराशेजारी असणाऱ्या पिठाच्या गिरणीचा आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाने त्रास होत आहे, अशी तक्रार केली होती. गेल्या अडीच वर्षांपासून या आवाजांमुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याची तक्रार तिनं केली होती. त्यामुळं रागातून तक्रार का केली? असं म्हणून मार्च महिन्यात गावातील सरपंच आणि इतर लोकांनी तिला घरी येऊन धमकावलं होतं. 

ग्रामीण पातळीवर देखील आता ध्वनी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झालेला असून किरकोळ कार्यक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात डीजे तसेच इतर वाद्य रात्री उशिरापर्यंत वाजवली जातात आणि कुणी तक्रार केली तर धार्मिक आणि जातीय अँगल देऊन समोरील व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते अशी वस्तुस्थिती आहे. 

पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना ,’ मारहाण केल्यानंतर त्यांनी वाईट हेतूनं माझ्या हाताला धरून अंगाला स्पर्श करून विनयभंग करत अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली . झालेल्या प्रकाराने मी आणि माझें कुटुंब दहशतीत आहेत. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, पोलिसांनी सर्वांना अटक करून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना जामीन होऊ नये, अशी कडक कारवाई करावी, असे म्हटले आहे. 

“सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील महिलेला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे?”, असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे. 


शेअर करा