हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरातील वृक्षतोडीवरून सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत पर्यावरण आणि जैवविविधता यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रसंगी पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन काम करू अशा शब्दात तेलंगाना सरकारची खरडपट्टी काढलेली आहे. न्यायमूर्ती भूषण गवळी आणि न्यायमूर्ती अगस्तीन जॉर्ज यांच्या खंडपीठाने घाईघाईने झाडे तोडल्याबद्दल न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
100 एकर परिसरातील जंगल तुम्ही पुन्हा कसे प्रस्थापित करणार आहात ? असा खडा सवाल ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांना न्यायालयाकडून करण्यात आला. तेलंगणा सरकारच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी हे काम पाहत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी , जंगलाची तोड होत असताना वन्यप्राणी सैरावैरा धावत होते या घटनेचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले असून हे चित्र धक्कादायक आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत असे देखील निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.