सोनानगर चौकात उभी होती होंडा सिटी , पोलिसांनी कारवाई केली तर गाडीत.. 

शेअर करा

नगरमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून गांजा बाळगणाऱ्या दोन जणांना तोफखाना पोलिसांनी अटक केलेली आहे. तब्बल आठ किलो गांजासोबत चार चाकी वाहन असा सहा लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. सावेडी परिसरातील सोनानगर येथील विराम हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत 15 तारखेला रात्री ही कारवाई करण्यात आली. 

विराम हॉटेलच्या समोरील एका मोकळ्या जागेत होंडा कंपनीच्या चार चाकी गाडीत दोन जण गांजा विकण्यासाठी आलेले आहेत अशी माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातून तोफखाना पोलिसांना मिळालेली होती त्यानंतर त्यांनी कारवाईच्या उद्देशाने गाडीला घेराव घातला आणि कारवाई केली. 

संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर ( वय 25 वर्ष ), सचिन प्रताप कतारी ( वय 26 वर्ष दोघेही राहणार संजय गांधीनगर संगमनेर ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गांजासोबत पाच लाख रुपये किमतीची होंडा कंपनीची चार चाकी गाडी जप्त केलेली असून तोफखाना पोलिसात हवालदार योगेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेअर करा