पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामपंचायत कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने मढीचे सरपंच संजय बाजीराव मरकड यांच्या विरोधात अश्लील वर्तन करत आपला शारीरिक छळ केल्याची फिर्याद नोंदवलेली आहे. पाथर्डी पोलिसात संजय मरकड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
विशेष बाब म्हणजे मरकड यांनी दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिलेली होती असा गुन्हा नोंदवलेला होता त्यानंतर आता मरकड यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पाथर्डी पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत ,’ मी ग्रामपंचायत कार्यालयातून घरी जात असताना मरकड यांनी मला थांबून तुझ्या मुलाला कामावर पाठवू नको असा दम दिला आणि अश्लील बोलत माझा विनयभंग केला ,’ असे म्हटलेले आहे.