नगरमध्ये सातत्याने कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून भागीदारीत व्यवसाय सुरू केल्यानंतर हिशोबाचे पैसे मागितल्यानंतर दोन जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत एका व्यक्तीला फ्लॅटच्या बाहेर काढून बेदम मारहाण केलेली आहे सोबतच त्याच्यावर कोयत्याने वार देखील केलेले आहेत. सात मार्च रोजी निंबळक बायपास रोडवर आणि 29 मार्च रोजी कल्याण रोडवरील माधवनगर इथे ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , नितीन कुमार भगवानराव दिपके ( वय 31 वर्ष राहणार जवळा बाजार औंढा नागनाथ हिंगोली सध्या राहणार कल्याण रोड अहिल्यानगर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून आदित्य विजय शिंदे आणि विजय शिवाजी शिंदे ( दोघेही राहणार नालेगाव ) यांनी फिर्यादी यांना पाण्याच्या बॉटल व्यवसायात पार्टनर म्हणून घेतले होते.
पार्टनरशिपमध्ये वाद निर्माण झाले त्यानंतर फिर्यादी यांनी या व्यवसायात अडकवलेले 28 लाख रुपये आरोपींकडे मागितले त्यावेळी भागीदारीचा हिशोब न पटल्याने वाद सुरू झाला. वादानंतर आदित्य शिंदे आणि विजय शिंदे यांनी फिर्यादी यास दोन वेळा मारहाण केली त्यानंतर तोफखाना पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.