खासदार निलेश लंके यांनी नगरकरांना दिली गुड न्यूज , तब्बल 31 कोटी रुपये आता

शेअर करा

अहिल्यानगर रेल्वे स्थानकासाठी 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून खासदार निलेश लंके यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केलेला होता. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार निलेश लंके यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आभार मानलेले आहेत. 

निलेश लंके यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ,’ अहिल्यानगर रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत केंद्र सरकारकडून ३१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत — प्रतीक्षा कक्ष, लिफ्ट, एस्केलेटर, स्वच्छतागृहे, अन्नगृह, डिजिटल बोर्ड्स आणि बरीच सुधारणा! 

या निर्णयासाठी आपण सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारचे, रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार. अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी माझा प्रयत्न असाच अखंड सुरू राहील. ‘ असे म्हटलेले आहे.


शेअर करा