अहिल्यानगर शहरातील उपनगर असलेल्या केडगाव मधून एक वीस वर्षीय तरुणी बेपत्ता झालेली असून बाजारात भाजीपाला आणायला जाते असे म्हणून ती घराबाहेर पडलेली होती. दहा एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडलेली असून गायब तरुणीचा शोध सध्या सुरू आहे.
कोतवाली पोलिसात तरुणी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली असून तिच्या नातेवाईकांनी ही तक्रार दिलेली आहे. भाजीपाला आणण्यासाठी म्हणून बाजारात चालले आहे असे तिने सांगितले आणि उशिरापर्यंत घरी आली नाही. केडगावमध्ये तिच्या मैत्रिणी नातेवाईक यांच्याकडे कुटुंबीयांनी चौकशी केली मात्र ती मिळून आली नाही म्हणून अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली.