खडकवाडी परिसरात सापळा लावला आणि डंपर आला त्यानंतर.. 

शेअर करा

पारनेर तालुक्यात खडकवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे. त्याच्याकडून 15 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , रोहित शाहूराज साळवे ( वय 26 वर्ष राहणार कासारे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून गुप्त माहितीच्या आधारे खडकवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. 

रोहित साळवे यांच्याकडून अवैध वाळूने भरलेला डंपर जप्त करण्यात आलेला असून पारनेर पोलिसात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गणेश लोंढे , संदीप दरंदले , विशाल तनपुरे , मनोज लातूरकर यांनी ही कारवाई केलेली आहे. 


शेअर करा