गुजरात मॉडेल..समुद्राच्या तळाशी सापडले इतक्या कोटींचे अमली पदार्थ 

शेअर करा

ज्या गुजरात मॉडेलचा भाजपकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येतो त्याच गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अमली पदार्थ जप्त होत आहेत. गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि तटरक्षक दलाने संयुक्त मोहीम राबवत 14 तारखेला अरबी समुद्रात तळाशी फेकलेला अमली पदार्थाचा सुमारे तीनशे किलोचा साठा जप्त केलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 1800 कोटी रुपये आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , गुप्तचर यंत्रणांना समुद्राच्या तळाशी साधारण तीनशे किलो अमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती समजली त्यानंतर समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ ही कारवाई करण्यात आली. तटरक्षक दलाची बोट दिसताच तस्करांनी त्यांच्याकडील मुद्देमाल समुद्रात फेकून दिला आणि सीमा ओलांडून पळून गेले. 

तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्रातून अखेर हा माल बाहेर काढलेला आहे. एटीएसकडे साठा सुपूर्त करण्यात आलेला असून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची आवक गुजरातमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. 


शेअर करा