अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्यानंतर चीन पाठोपाठ युरोपियन युनियन यांनी देखील अमेरिकेला धडा शिकवण्याच्या उद्देशाने पावले उचललेली आहेत सोबतच कठोर शब्दात अमेरिकेच्या भूमिकेवर टीका देखील केलेली आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकार यांनी अमेरिकेवर एका शब्दाचीही टीका केलेली नाही उलट देशातीलच निर्यातदारांना नव्या बाजारपेठांचा शोध घेण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.
मंत्रालयाच्या वतीने नेहमीप्रमाणे निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी निर्यात धोरणाची आखणी आणि तातडीने अंमलबजावणी करू अशी साचेबद्ध माहिती देण्यात आलेले असून अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 26 टक्के शुल्क निर्यात शुल्क लादलेले आहे.
मेक इन इंडियाचा बोजवारा उडालेला असून मोठ्या प्रमाणात स्टार्टअप कंपन्या सुरू झालेल्या असल्या तरी त्या स्टार्टअपच राहिलेल्या आहेत त्यांचा विस्तार झालेला नाही . दुसरीकडे युएई सारख्या देशात प्रथम गुंतवणूकदार म्हणून भारताचे नाव घेतले जाते . भारतातील गुंतवणूकदारांचे उद्योग भारतातच सुरू का झालेले नाहीत यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज असताना निर्यातदारांनाच वेगवेगळे सल्ले सध्या मंत्रालयाकडून देण्यात येत आहेत.