अखेर संगमनेरच्या ‘ त्या ‘ डॉक्टरची इतक्या दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी

शेअर करा

संगमनेर येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा डॉक्टर कर्पे याला सोमवारी सात तारखेला न्यायालयात हजर करण्यात आलेले होते त्यावेळी त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , डॉक्टर अमोल करपे असे या 43 वर्षीय डॉक्टरचे नाव असून शहरातील करपे रुग्णालयात 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी उपचार घेत होती. आरोपीने तिच्यावर धमकी देत अत्याचार केला आणि प्रकरणाला वाचा फुटताच आरोप फरार झालेला होता. 

नाशिक जिल्ह्यातून अमोल करपे याला ताब्यात घेण्यात आले होते. आरोपी डॉक्टरवर कठोरात कठोर कारवाईची मागणी फिर्यादी मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेली असून अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याला हजर केले असताना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 


शेअर करा