मार खाणाऱ्या दांपत्याच्या विरोधातच गुन्हा दाखल , शेवगाव पोलिसांचा प्रताप

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार शेवगाव तालुक्यात समोर आलेला असून घरासमोर असलेल्या रस्त्यावर ट्रॅक्टर लावल्याच्या वादातून पती-पत्नीला जबर मारहाण करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे शेवगाव पोलिसांनी जखमी झालेल्या दांपत्याच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संपत रंगनाथ वांढेकर ( वय 49 वर्ष ) आणि आशाबाई संपत वांढेकर ( वय 39 वर्ष ) अशी जखमी झालेल्या दांपत्याची नावे असून  शुक्रवारी 11 तारखेला रात्री आठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. 

शेवगाव तालुक्यातील वाघोली इथे जमधडे वस्तीवर हा प्रकार घडलेला असून अशोक देवराव कराळे याचा ट्रॅक्टर डिझेल संपल्याने थांबलेला होता. भर रस्त्यात ट्रॅक्टर उभा केल्यावरून वांढेकर आणि कराळे यांच्यात वादावादी झाली आणि त्यानंतर मारामारीला सुरुवात झाली. अशोक देवराव कराळे याच्यासोबत चार-पाच जणांनी वांढेकर दांपत्याला बेदम मारहाण केली आणि फिर्यादी महिला आशाबाई वांढेकर यांच्या अंगावर दुचाकी घातली. 

वांढेकर दांपत्य गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी असलेल्या दांपत्यावरच गुन्हा दाखल करण्याचा शेवगाव पोलिसांचा प्रताप या निमित्ताने समोर आलेला असून घटनेबद्दल शेवगाव तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे.


शेअर करा