राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती इथे बोलताना ,’ मी जितकी विकास कामे केली तितकी कामे आगामी काळात कोणीच करू शकणार नाही. बारामतीकरांना माझ्यासारखा आमदार परत मिळणार नाही ,’ असा दावा केला आहे.
बारामती येथील पंचायत समितीत आयोजित कार्यक्रमात सहा तारखेला बोलताना अजित पवार यांनी ,’ मी जेवढे काम केलेले आहे तेवढे काम करणारा आमदार तुम्हाला पुढील काळात मिळणार नाही असा माझा दावा आहे. तुम्ही आजपर्यंत बारामतीचे प्रतिनिधित्व केलेल्या अनेक आमदारांची कारकीर्द पहा. माझ्या कालावधीत किती काम झाले हे तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहे मात्र मी एवढे कामे करून थांबणार नाही ,’ असेही ते पुढे म्हणाले.
दिव्यांग व्यक्तींना सायकलचे वाटप करण्यात आले त्यावेळी अजित पवार म्हणाले की,’ ‘ दिव्यांग व्यक्तींसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील एक टक्का निधी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आगामी काळात दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही ,’ असेही ते पुढे म्हणाले.