एक व्यक्ती जय भीम म्हणून पुढच्या दुसर्या व्यक्तीस अभिवादन करू लागल्याने त्यास प्रत्युत्तर म्हणून दुसरी व्यक्ती जय भीम म्हणत प्रतिसाद देत आहे त्यामुळे दलित बांधवांमध्ये एकमेकांना भेटल्यावर अभिवादन करताना जय भीम करण्याची पद्धत सुरू झाली. जय भीम दलित, आंबेडकरी, बुद्ध समाजाच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रशांत खैरे यांनी केले.
सावेडी उपनगरात वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दीपक पाटोळे, अँड. लक्ष्मीकांत पठारे, रविकिरण जाधव, गणेश राऊत,भारत भालेराव, शिरीष जानवे, अशोक औटी,अशोक देवढे, बाबा वारे, शुभम खुडे, अविनाश वाघचौरे, अंकुश मालसमिंदर, शुभम जगदाळे, दीपक जाधव, देविदास भालेराव, जयदेश देठे, संकेत तनपुरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री खैरे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा देत आंबेडकरी चळवळीबाबत माहिती दिली. लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी ठेवण्यात आली होती तर अहिल्यानगर ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिरात युवकांनी सहभाग नोंदवून रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यावेळी तुषार जवरे, सुधीर ठोम्बे, रवींद्र शिरसाठ, वंदना साठे,प्रतीक साठे, प्रेम साठे, रोहित गाडे,ओम गाडे,केदार बल्लाळ सचिन रणदिवे, विक्रम मकासरे, खंडू पानमळकर, माऊली गायकवाड, प्रतीक जाधव,देविदास भालेराव आदी उपस्थित होते. प्रारंभी बौद्धाचार्य दीपक पाटोळे यांनी त्रिसरण पंचशील भीम स्मरण,भीम स्तुती गायन केले आणि जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या. योगेश साठे यांनी सर्वांचे आभार मानले.