मोदीजी कदाचित My Experiments with Lies लिहतील , राहुल गांधी म्हणाले की.. 

शेअर करा

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला असून , ‘महात्मा गांधींनी माझे सत्याचे प्रयोग लिहिले होते. मोदीजी कदाचित My Experiments with Lies लिहतील. शेअर बाजारातील प्रचंड घसरणीवर राहुल म्हणाले, ‘अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शेअर बाजार उद्ध्वस्त केला आहे. आज बाजार कोसळला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी यांच्यावर हल्लाबोल करत ट्रम्प यांनी भ्रमाचा पर्दाफाश केला असून वास्तव समोर येत आहे. पंतप्रधान मोदी कुठेच दिसत नाहीत. भारताला वास्तव स्वीकारावे लागेल. सर्व भारतीयांसाठी काम करणारी लवचिक, उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. 

बिहारमधील रॅलीत आरएसएसवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की , ‘देशाच्या घटनेत सावरकरांचे विचार प्रतिबिंबित झालेले नाहीत. यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, आंबेडकर यांच्यासारख्या लोकांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब दिसते. आज या देशात आदिवासी आणि दलित हे दुसरे नागरिक आहेत. 

राहुल 38 मिनिटांच्या भाषणात काय म्हणाले ? 

1. NDA सरकार अदानी-अंबानींना फायदा करून देत आहे

2. जात जनगणना करण्याचे आश्वासन दिले

3. 90 टक्के मजूर दलित आणि आदिवासी आहेत

4. दलित आणि मागासवर्गीयांना पक्षात अधिकार दिले

5. तुमच्या चुका मान्य करा


शेअर करा