यूपीआय पाठोपाठ व्हाट्सअप ला देखील अडचणी सुरू ,  कारणाचा शोध घेण्याची गरज अन्यथा.. 

शेअर करा

देशभरात सध्या मोठ्या प्रमाणावर नागरिक डिजिटल पेमेंटचा वापर करत असून काल दुपारी यूपीआय यंत्रणा अचानकपणे बंद पडलेली होती. अनेक जणांचे आर्थिक व्यवहार यामुळे ठप्प झाले आणि समाज माध्यमांमध्ये देखील याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. 

गुगल पे , पेटीएम, भीम , फोन पे अशा अनेक यूपीआय प्लॅटफॉर्म मधून पेमेंट होत नसल्याने अनेक जणांना अडचणी निर्माण होऊ लागल्या सोबतच संध्याकाळच्या वेळी व्हाट्सअप देखील काही काळ बंद पडल्याने मेसेजची देखील अडचण निर्माण झालेली होती. सरकारी कार्यालयांमध्ये देखील व्हाट्सअप चा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने शासकीय अधिकाऱ्यांचा देखील एकमेकांशी संपर्क बंद झालेला होता. 

गेल्या एक महिन्यात सातत्याने यूपीआय पेमेंटला अडचणी येणे तसेच व्हाट्सअप वर देखील मेसेज पाठवल्यास येत असल्याने त्या पाठीमागील कारणांचा शोध घेणे नितांत गरजेचे आहे. सव्वीस मार्च आणि दोन एप्रिल रोजी देखील यूपीआय सेवा काही काळ बंद पडलेली होती. सातत्याने असे प्रकार होत असल्याने अधिक काळ जर अशी अडचण राहिली तर  नागरिकांना भविष्यात प्रचंड मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल. 


शेअर करा