तमाशा सुरू असतानाच सात जण स्टेजवर चढले अन .., सर्वांवर गुन्हा दाखल

शेअर करा

तमाशा कलाकारांना प्रेक्षकांकडून होणारा त्रास काही नवीन राहिलेला नाही असाच एक प्रकार नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लोहसर येथे समोर आलेला असून भैरवनाथ देवस्थानच्या यात्रेत तमाशा कार्यक्रमात गोंधळ घालून कलाकारांना चक्क शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आलेली आहे. 13 एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

सात जणांच्या विरोधात याप्रकरणी पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. अनिल उर्फ अनुराग जगन्नाथ गीते यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद दिलेली असून फिर्यादी हे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे काम पाहतात. गावातील अविनाश पालवे , रवींद्र पालवे हे स्टेजवर चढून कलाकारांना तमाशा सुरु असताना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत होते.

फिर्यादी यांनी त्यांना खाली उतरण्यासाठी विनंती केली मात्र त्यानंतर खंडू वायबसे, प्रकाश पवार , कार्तिक गीते , कृष्णा गीते आणि निलेश वारे यांनी देखील मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तमाशा कलावंतांमध्ये या प्रकारानंतर भीतीचे वातावरण पसरले आणि तमाशा देखील अखेर बंद पडला. सातही जणांच्या विरोधात सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ घालणे , कलाकारांना शिवीगाळ दमदाटी करणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा