चक्क जिल्हाधिकाऱ्याला दिली खुनाची धमकी ,  महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का ? 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून चक्क जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा खून करण्याची धमकी ईमेलवर देण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा खून करण्यात येईल त्यांना डंपरने उडून देऊ अशी धमकी ई-मेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर देण्यात आलेली होती. जळगावच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा त्यामध्ये भ्रष्ट असा उल्लेख करून त्यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात आली होती. 

मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ गृह विभागाकडे हा ई-मेल फॉरवर्ड केलेला असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. बनावट ई-मेल अकाउंट मधून हा ईमेल पाठवला असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


शेअर करा