भाजप नेते गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रकाराच्या माहितीच्या हवाल्याने हा आरोप केलेला होता सोबतच संबंधित महिला कोण आहे हे देखील सर्व सर्वांना माहीत आहे मात्र त्यांचे नाव घेणे योग्य राहणार नाही , असे म्हटलेले होते. एकनाथ खडसे यांच्या या आरोपानंतर गिरीश महाजन प्रचंड संतापलेले असून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन ?
मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर ते बाहेर निघाले तरी लोक त्यांना जोड्याने मारतील. मी अजूनही त्यांना आव्हान देतो. त्यांनी फक्त एक पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडतो. मी कधीच कोणाला तोंड दाखवणार नाही. त्यांनी पुरावे लोकांना दाखवावेत. त्यांनी नुसतं बडबड करू नये. यांना पुरावे दिले, त्याला पुरावे दिले, असे करू नये.
एकनाथ खडसे याना खोटं बोलताना लाज वाटत नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की, त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा आता त्यांनी अंत पाहू नये. मी एका गोष्टीचा खुलासा केला, तर तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे. पण मी ती बोलणार नाही. मला बोलयला लावू नका. खडसे यांनी एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला. त्यातूनच हे सगळं समोर आलं आहे ,’