माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली असून वांद्रेच्या कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपयाची पोटगी द्यावी, असा निकाल दिला होता मात्र या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली त्यावेळी संबंधित कागदपत्रे हे बनावट असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला मात्र कोर्टाने निर्णय धनंजय मुंडे यांच्या विरोधातच दिलेला आहे.
माझगाव कोर्टाने वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळत कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल करुणा शर्मा यांच्याच बाजूने लागल्याचं मानलं जात आहे.आधीच्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत आपलं लग्न झाल नसल्याचा युक्तिवाद केला मात्र करुणा शर्मा यांच्यापासून दोन मुलांचा जन्म झाला आणि त्या दोन्ही मुलांची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचं धनंजय मुंडे यांनी न्यायालयात मान्य केलं पण आपलं अधिकृतपणे करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झालं नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांचा वकिलांकडून करण्यात आला.
माझगाव सत्र न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीवेळी करुणा शर्मा यांनी पासपोर्ट, रेशन कार्डमध्ये तसेच स्वीकृती पत्र आणि अंतिम इच्छापत्र हेच दाखल केलं त्यात कागदपत्रांमध्ये करुणा मुंडे यांचाच पहिली पत्नी असा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केल्याचं म्हटलं तसेच स्वीकृती पत्रात धनंजय मुंडे यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, कुटुंबीयांच्या दबावामुळे मी दुसरं लग्न केलं आहे पण मी करुणा शर्मा आणि मुलांचादेखील सांभाळ करेन. त्यांचा पहिली पत्नी म्हणून मी स्वीकार करेन, असं स्वीकृती पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या कागदपत्रांचे निरीक्षण करुन आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला आहे.यानंतर आता धनंजय मुंडे या निकालाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान देऊ शकतात.