महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून नवविवाहित सुनेला सारखं तू फोनवर कोणाशी बोलतेस इतक विचारल्याचा राग आल्यानंतर वाद झाला आणि त्या वादातून सुनेने सासूचा खून केलेला आहे. जालना येथील ही घटना असून सासूचा खून केल्यानंतर सून माहेरी फरार झालेली होती मात्र तिला अटक करण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे . सहा महिन्यांपूर्वी आकाश शिनगारे याचं लग्न परभणी येथील प्रतीक्षा हिच्यासोबत झाले होते. लग्नानंतर दोघांचाही संसार सुरळीत सुरु होता मात्र नवीन जोडप्यासोबत आधाराला मोठं माणूस हवं म्हणून आकाशची आई सविता शिनगारे त्यांच्यासोबत राहत होत्या.
काही दिवसापासून आपली सून कोणाशी तरी फोनवर बोलते याची कुणकुण सासूला लागली पण नेमके कोणासोबत तिच्या गप्पा रंगतात, हे सासूला समजत नव्हतं.बुधवारी याच कारणामुळे दोघींमध्ये सकाळी वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या प्रतीक्षाने रागाच्या भरात सासू सविता शिनगारे यांच्यावर चाकूने सपासप वार करुन खून केला.
आपल्या हातून खून झाल्यानंतर प्रतीक्षा घाबरून गेली आणि तिने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ती गोणी ओढत तिने खाली आणली पण घरमालकाचे लक्ष आपल्याकडे आहे हे लक्षात येताच तिने ती गोणी तशीच ठेवून पळ काढला आणि रेल्वे स्टेशनला जाऊन परभणीतील घर गाठलं. त्यानंतर घाबरलेल्या घरमालकाने तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवली आणि प्रतीक्षा तिला परभणीला जाऊन ताब्यात घेतले.
सदर घटनेची माहिती मिळताच पती आकाश लातूर येथून थेट जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. आईचा मृतदेह पाहून त्याने ” माझ्या आईला का मारलं? मारायचं होतं तर मला मारायचं, असं तो मोठमोठ्याने रडत सांगत होता. माझ्यासोबत पटत नव्हतं, तर लग्न करायचं नव्हतं. कशाला लग्न केलं? माझ्या आईसोबत पटत नव्हतं, तर मला मारायचं असतं, कोणी एवढे निर्दयीपणे मारतं का?” म्हणत टाहो फोडला.