जामखेड येथील कॅनरा बँकेच्या शाखेत चक्क बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने त्यांची रवानगी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , बँकेचा गोल्ड व्हॅल्यूवर अण्णासाहेब कोल्हे , खातेदार मनावर पठाण, दिगंबर आजबे आणि अनिता जमदाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बँकेच्या वतीने यासंदर्भात पोलिसात फिर्याद देण्यात आलेली आहे.
गोल्ड व्हॅल्यूवर असलेला अण्णासाहेब कोल्हे याच्यासोबत संगणमत करत उर्वरित आरोपींनी कॅनरा बँकेच्या जामखेड येथील शाखेत बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवले आणि 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यांच्या विरोधात जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.