घ्या अच्छे दिन..घरगुती गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी महाग तर पेट्रोल डिझेल देखील.. 

शेअर करा

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आता घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची वाढ केलेली आहे. दिल्लीत आता गॅस सिलेंडरचे दर 803 रुपयावरून 853 रुपयावर गेलेले आहेत तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात देखील दोन रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. आज रोजी तरी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नसल्याचे पेट्रोलियम मंत्री यांनी सांगितलेले आहे. 

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर लक्षणीय प्रमाणात कमी झालेले आहेत मात्र त्याचा भारतीयांना कुठलाच फायदा आज रोजी तरी दिसून येत नाही. केवळ पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे संकेत देण्यात येतात मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना कुठलाही फायदा कोरोना काळापासून तर आजपर्यंत झालेला नाही. 

क्रूड ऑइलचे प्रति बॅरल दर 63 डॉलरच्या आसपास आहेत. यूपीए सरकार असताना 140 च्या वर पेट्रोल प्रति बॅरल दर गेले होते मात्र तरीही त्यावेळी पेट्रोलचे दर हे 75 रुपयांच्या आसपास होते. आज रोजी 63 डॉलर पर्यंत प्रति बॅरल दर कमी झालेला असला तरी ग्राहकांना त्याचा कुठलाच दिलासा मिळालेला नाही. 


शेअर करा