नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत आरोपींना लोणी येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , नदीम सत्तार चौधरी ( वय 32 वर्ष ) आणि अन्सार सत्तार चौधरी ( वय 44 वर्ष दोघेही राहणार नाईकवाडी मोहल्ला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून दोन्ही आरोपी हे राहता तालुक्यात आलेले असल्याची माहिती मिळालेली होती त्यानुसार त्यांनी पथकातील सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात , पोलीस अंमलदार बापूसाहेब फुलाने, ज्ञानेश्वर शिंदे , संदीप दरंदले , भाग्यश्री भिडे यांच्यासह पथक सक्रिय केले आणि हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या आरोपींना गुन्हेगारांना ताब्यात घेतले.