अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात त्या दोघांना जन्मठेप , नगर जिल्ह्यात  घडली होती घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश डीपी शिंगाडे यांनी दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , रामभाऊ उर्फ रामराव पवार ( वय 22 वर्ष ) आणि युवराज नंदू शेंडगे ( वय 23 वर्ष दोघेही राहणार लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदे ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्याची नावे आहेत. 

दोन्ही आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ चित्रण देखील केले. सात मार्च रोजी एका व्यक्तीने पीडितेच्या आई-वडिलांना हा व्हिडिओ दाखवला त्यानंतर त्यांनी पीडित मुलीकडे चौकशी केली त्यावेळी हा प्रकार समोर आला. आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिलेली असल्याने पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता मात्र आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 

परिसरातील काही व्यक्ती , श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज कुमार शिंदे , फॉरेन्सिक लॅब प्रयोगशाळेचे निलेश पाटील पंच , लक्ष्मण वाकळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या साक्षी यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट केदार केसकर यांनी काम पाहिले तर त्यांचे मदतनीस म्हणून अनिकेत भोसले यांनी काम पाहिले. 


शेअर करा