नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून संगमनेर शहरातील करपे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान ही संतापजनक घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , डॉक्टर अमोल करपे याच्या रुग्णालयात पीडित अल्पवयीन मुलगी ही शुक्रवारपासून उपचार घेत होती. रविवारी पहाटे डॉक्टर करपे याने तिला रुग्णालयाच्या टेरेसवर घेऊन जात तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि त्यानंतर धमकी दिली.
पीडित मुलीने घडलेला प्रकार काकांना सांगितला त्यानंतर शहर पोलिसात डॉक्टर अमोल करपे याच्यावर अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून फरार झालेल्या डॉक्टरला कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रात यानंतर खळबळ उडाली आहे .