नगर शहरात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून सावेडी उपनगरात वाहन पार्किंगच्या वादातून एका डॉक्टरनेच सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केलेली आहे . डॉक्टर अमित भराडीया असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शंकर भालेश्याम कोडम ( वय 58 राहणार नित्यसेवा सोसायटी श्रीराम चौक अहिल्यानगर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून शंकर कोडम हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. डॉक्टर अमित भराडिया चारचाकी वाहन पार्किंग करत असताना त्याच्याजवळ आले त्यावेळी कोडम यांनी वाहन इथे पार्किंग करू नका असे डॉक्टरांना सांगितले त्याचा त्यांना राग आला. त्यांनी कोडम यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहे.