नगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दहा मार्च 2025 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात शस्त्र आणि जमावबंदीचा आदेश जारी केलेला आहे.
सदर आदेश हा धार्मिक कार्यक्रम , लग्नकार्य मिरवणूक , लग्न मिरवणूक तसेच प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नसून रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींसाठी देखील लागू राहणार नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असे आदेशात म्हटलेले आहे.