नगरमध्ये एक धक्कादायक असे ब्लॅकमेलिंग प्रकरण समोर आलेले असून एका सराफ व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यानंतर अश्लील व्हिडिओ आणि फोटोच्या नावाखाली तब्बल साडे सत्तावीस लाख रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. पुण्यातील उरुळी कांचन येथील एका सराफ व्यावसायिकाने कोतवाली पोलिसात फसवणूक करणारी महिला आणि तिचा पती दोघांच्याही विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार सराफ व्यावसायिक हा उरुळी कांचन येथील रहिवासी असून संबंधित आरोपी महिलेने 2012 मध्ये सराफाच्या दुकानातून सोने खरेदी केलेले होते त्यानंतर आपल्या बहिणीला देखील सोने खरेदी करायचे आहे असे सांगत आरोपी महिलेने फिर्यादी सराफ व्यावसायिकाचा नंबर मिळवला आणि त्यानंतर त्याच्यासोबत संपर्क साधायला सुरू केले.
आरोपी महिलेने त्याला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलवून त्यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडिओ गुपचूप मोबाईलमध्ये काढले आणि 22 नोव्हेंबर 2022 त्यांना नगरला बोलावले. फिर्यादी महिलेचा पती देखील त्यावेळी तिच्यासोबत होता त्यावेळी त्याने आणि आरोपी महिलेने तुझे फोटो तुझ्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना दाखवू अशी धमकी देत वेळोवेळी सराफ व्यावसायिकाकडून तब्बल साडे सत्तावीस लाख रुपये उकळले.
इतकी रक्कम देऊनही फिर्यादी महिला सातत्याने सराफ व्यावसायिकाला पैशासाठी ब्लॅकमेल करत होती अखेर कंटाळून सहा एप्रिल रोजी सराफा व्यावसायिक हा नगरला आला आणि त्यानंतर त्याने कोतवाली पोलिसात केडगाव येथील या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. कोतवाली पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.