अवैध मुरूम वाहतूक करत असताना पकडलेला डंपर सोडून देतो असे सांगत तीन हजार रुपयांची लाच घेताना एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अभिषेक दत्तात्रय जगताप ( राहणार शेवगाव ) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार व्यक्ती यांचा 30 जुलै रोजी अवैध मुरूम वाहतूक करताना तहसीलदारांनी डंपर पकडलेला होता त्यावेळी दोन लाख छत्तीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई देखील तक्रारदार यांच्यावर करण्यात आली.
तक्रारदार यांनी दंड भरला नाही म्हणून डंपर लिलावात काढण्यात आला त्यानंतर दंड भरण्यात आला मात्र डंपर सोडण्याचा अंतिम आदेश देण्यासाठी खाजगी व्यक्ती अभिषेक जगताप याने तक्रारदार यांच्याकडे तुमचे काम करून देतो असे सांगत लिपिक मोडसे मॅडम यांना देण्यासाठी म्हणत तीन हजार रुपयांची लाच घेतली.
सदर कारवाई अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक आणि अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्हाट , महिला पोलीस हवालदार राधा खेमनर , चंद्रकांत काळे ,दशरथ लाड यांनी केलेली आहे.