अल्पवयीन मुलीला पळवून श्रीरामपूरमध्ये आणलं ,  मुलीच्या आईने अखेर.. 

शेअर करा

श्रीरामपूर तालुक्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून तालुक्यातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून श्रीरामपूरमध्ये आणल्या प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अमीर अजीज शेख असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला त्याच्यासोबत श्रीरामपूर इथे पळवून आणलेले होते. मुलीच्या आईने यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिलेली असून आरोपीने तिचे फोटो व्हायरल करण्याची तिला धमकी दिलेली होती. आरोपीच्या विरोधात त्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा