नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या दोन जिवलग मित्रांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली असून पुण्यात शनिवारी बारा तारखेला ही घटना समोर आलेली आहे. पुण्यातील मोशी परिसरात दोघा मित्रांनी सोबतच गळफास घेतला.
उपलब्ध माहितीनुसार , तुषार अशोक ढगे ( वय २५ वर्ष ) आणि सिकंदर सल्लाउद्दीन शेख ( वय तीस वर्ष दोघेही राहणार पिंपळगाव उंडा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर ) अशी या जिवलग मित्रांची नावे आहेत.
मोशी परिसरात दोघांनीही गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. शनिवारी सकाळी झाडावर लटकलेल्या अवस्थेत हे दोघेही मित्र नागरिकांना दिसले. त्यांच्या खिशात मोबाईल आढळून आला त्यावरून ते नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समजली . दोघेही जामखेड इथे चालक म्हणून काम करत होते. सिकंदर शेख याचे लग्न झालेले होते तर तुषार हा अविवाहित होता .