भारताचे पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय ,  सीमा हैदरच काय होणार ? 

शेअर करा

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली असून पाकिस्तानवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ठिकठिकाणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.  भारतातील पाकिस्तानी दूतावास बंद करणं, सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं, सिंधू जल करार समाप्त करणं आणि अटारी चेकपोस्ट बंद करणं असे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे भारतात बेकायदेरित्या राहणारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरच्या भविष्याबद्दल देखील प्रश्न निर्माण झाला आहे. 

सीमा हैदरने मे 2023 मध्ये नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता. आता सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिचा विषय सुद्धा चर्चेत आहे. सीमाने ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा येथे राहणाऱ्या सचिन मीणासोबत लग्न केलं. तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला असून अलीकडेच तिने एका मुलीला जन्म दिला त्यामुळे तिचा विषय अधिक जटिल बनला आहे. सीमा हैदरकडे भारताची नागरिकता नाही शिवाय  उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या निरीक्षण कक्षेत ती आहे. 

सीमा हैदरचा अवैधरित्या भारतात प्रवेश करण्याचा विषय नोएडा येथील न्यायालयाच्या विचाराधीन आहे. 4 जुलै 2023 रोजी तिला आणि सचिन मीणाला पोलिसांनी अटक केली होती पण नंतर जामिनावर दोघांची सुटका केली. सीमाने वारंवार म्हटलय की, तिला भारतातच रहायचं आहे. इथेच माझा मृत्यू होईल असं तिने म्हटलय. सीमा हैदरची मागणी मान्य व्हावी, यासाठी तिचे वकील एपी सिंह कोर्टात प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला सीमा हैदरचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने त्यांच्या चार मुलांच्या कस्टडीसाठी भारतीय आणि पाकिस्तानी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


शेअर करा