एकेकाळी भारताचा मित्र म्हणून ओळख असलेल्या बांगलादेशमध्ये आज भारताविरोधात तसेच हिंदू विरोधात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट दिसून येत आहे याचीच परिणीती म्हणून बांगलादेशच्या उत्तर भागात एका हिंदू नेत्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यास अपयशी दिसून येत आहे मागील दोन महिन्यात हिंदू समुदायावर आत्तापर्यंत हल्ल्याच्या 76 घटना घडल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , भावेशचंद्र रॉय ( वय 58 वर्ष ) असे अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव असून बांगलादेशातील दिनाजपुर जिल्ह्यातील वासुदेव पुरी इथे बुधवारी ही घटना घडली आहे.
भावेशचंद्र यांना एक फोन आलेला होता त्यानंतर अर्ध्या तासाने मोटरसायकलवर चार जण आले आणि त्यांचे अपहरण केले. बेशुद्ध अवस्थेत त्यांना घराजवळ सोडण्यात आले म्हणून कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन काढून या घटनेचा निषेध केलेला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील या घटनेचा निषेध केलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनूस यांच्या भेटीचा काहीही परिणाम झालेला नाही हिंदू बांधवांवर हल्ले सुरूच आहेत असे म्हटलेले आहे.