नगर शहरात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पेंटिंग काम केल्यानंतर कामाचे पैसे मागितले म्हणून वाद झाल्यानंतर हॉटेल चालकाने त्याच्या मुलासोबत इतर दोन जणांना हाताशी धरून पेंटरलाच बेदम मारहाण केली आणि त्यांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली. एमआयडीसी परिसरातील रेणुका नगर परिसरात गणेश चौकात 30 एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
उपलब्ध माहितीनुसार , विशाल याकूब पाटोळे ( वय 32 वर्ष राहणार रेणुका नगर अहिल्यानगर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून फिर्यादी यांनी आरोपी आदेश अविनाश धोंडे , अविनाश नाना धोंडे ( राहणार गणेश चौक नम्रता हॉटेल समोर रेणुका नगर ) यांच्या हॉटेलमध्ये आणि घराला काम रंग देण्याचे काम घेतलेले होते.
एक महिन्यांपासून दोन ते तीन मजुरांसह फिर्यादी यांनी काम केले मात्र त्यानंतर पैशावरून वादावादी झाली आणि धोंडे यांनी अगोदर सर्व काम पूर्ण करा त्यानंतर पैसे देईल असे सांगितले. मजुरांना मजुराची मजुरी द्यायची आहे मला आधी पैसे द्या त्यानंतर काम करतो असे फिर्यादी यांनी म्हटले त्यावरून वादावादी झाल्यानंतर आदेश धोंडे आणि अविनाश धोंडे यांच्यासोबत इतर दोन जणांनी फिर्यादी यास मारहाण केली. एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.