पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी सरकारकडून फ्री हँड पण इच्छाशक्ती आहे का ? 

शेअर करा

केंद्र सरकारकडून सैन्याला पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी फ्री हँड दिल्याची माहिती देण्यात आली होती मात्र वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ,’ केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले तरी सरकारमध्ये पाकिस्तानवर कारवाई करण्याची इच्छाशक्तीच नाही ,’ असे सांगत भारत सरकार सिंधू जलवाटप करार रद्द केल्याबद्दल खोटे सांगून जनतेची दिशाभूल करत आहे, असे म्हटलेले आहे. 

कोतुळ इथे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ,’ आपले सैन्य पूर्णपणे तयार आहे मात्र आपल्या राजकीय नेतृत्वाची तशी इच्छा दिसत नाही. सरकार समोर जलवाटप करार रद्द करण्याची गरज आहे काय ? आणि मनापासून त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा शक्ती आहे का ? हे स्पष्ट न केल्यास दोन मे 2025 रोजी आपण मुंबईत हुतात्मा स्मारकासमोर निदर्शने करणार आहोत,असे म्हटलेले आहे. 


शेअर करा