काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यभरात देशभरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाचे वातावरण असून चुकीची , दिशाभूल करणारी आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित करत असल्यावरून पाकिस्तानच्या सोळा यूट्यूब चैनल वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. भारतात हे चॅनेल आता दिसू शकणार नाहीत मात्र भारताबाहेर हे चॅनल पाहिले जाऊ शकतात.
उपलब्ध माहितीनुसार , जिओ न्यूज , डॉन , रफ्तार , बोल न्यूज , समा टीव्ही आणि माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा चॅनल यावरही बंदी घालण्यात आलेली आहे सोबतच बीबीसीच्या वार्तांकनावर देखील केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केलेली आहे.
दहशतवाद्यांचा उल्लेख कट्टरतावादी असा केला म्हणून केंद्र सरकार बीबीसीवर देखील नाराज आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा चॅनल मात्र बंद करण्यात आला नाही त्यावरून सोशल मीडियात चर्चा सुरू असून शाहिद आफ्रिदी याच्यावर ही मेहरबानी कशासाठी ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरमधील हल्ल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केलेले होते. एमआयएमचे नेते असुद्दिन ओवेसी यांनी देखील शाहिद आफ्रिदी याला खडे बोल सुनावत ,’ तो कोण आहे ? . असल्या विदूषकांची नावे माझ्यासमोर घेऊ नका. त्याच्या विधानाकडे फार लक्ष देण्याची गरज नाही ,’ असे म्हटलेले आहे सोबतच एफडीएफ या संघटनेला आंतरराष्ट्रीय संघटनेने करड्या यादीत समाविष्ट करावे अशीही मागणी ओवेसी यांनी केली.
गोदी मीडिया म्हणून ओळख असलेल्या इलेक्ट्रॉनिक चॅनेलवर पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक भारताच्या विरोधात गरळ ओकतात मात्र त्यांना ही संधी भारतीय चॅनल कशासाठी उपलब्ध करून देतात याविषयी देखील संताप व्यक्त केला जात आहे. . भारतीय चॅनलकडून मानधन घेऊन भारताच्याच विरोधात गरळ ओकणाऱ्या गोदी मीडियाला अशा व्यक्तींचा देशात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठीच फायदा होतो त्यामुळेच अशा व्यक्तींना या चॅनलवर स्थान मिळते अशी चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.