पारनेर तालुक्यात परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने पतीचा खून , अपघाताचा बनाव फसला

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार पारनेर तालुक्यात समोर आलेला असून काळेवाडी येथे अपघाताचा बनाव करत चक्क परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केलेली आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात परप्रांतीय प्रियकर आणि मयत व्यक्तीची पत्नी यांना अटक केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , बाबाजी शिवाजी गायखे असे मयत व्यक्तीचे नाव असून जनकभाई भूपदभाई भीडभीडिया ( राहणार गुजरात ) आणि मयत व्यक्तीची पत्नी सुप्रिया बाबाजी गायखे अशी आरोपींची नावे आहेत. 

निघोज ते पाबळ रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा अपघात झाल्याची माहिती पोलीस ठाण्याला प्राप्त झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी बाबाजी गायके यांचा मृत्यू झालेला होता. त्यांना कोणत्यातरी हत्याराने डोक्यात मारल्याने त्यांचा मृत्यू झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले. 

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी मयत व्यक्ती याच्या पत्नीने उडवाउडवीची  उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि अधिक तपासात परप्रांतीय म्हणून काम करणारा परप्रांतीय व्यक्ती जनकभाई याचे नाव समोर आले. आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर जनकभाई यांनी बाबाजी यांच्या डोक्यात धारदार हत्यार मारून त्यांचा खून केला आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव केला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारन यांच्या पथकाने विक्रमी वेगाने तपास करत आरोपीस जेरबंद केले. 


शेअर करा